शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बंद घर चोरट्यांच्या रडारवर.. धनलक्ष्मीनगरमध्ये अडीच लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 15:11 IST

रविवारी सकाळी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

ठळक मुद्दे१०९ ग्रॅम सोने, तर २८५ ग्रॅम चांदी केली लंपास

यवतमाळ : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, शुक्रवारी रात्री लोहारा, वाघापूर परिसरात दोन घरफोड्या झाल्या. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा जांब रोडवरील धनलक्ष्मीनगरमध्ये दोन लाख ६३ हजार रुपयांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले असून नागरिक बाहेरगावी जाण्यास घाबरत आहेत.

मारोतराव जगन्नाथ गावंडे यांचा दारव्हा येथे हिऱ्याचा कारखाना आहे. ते दारव्हा येथून अप-डाऊन करतात. १० डिसेंबरला त्यांची पत्नी व मुले बाहेरगावी गेली व गावंडे हेसुद्धा दारव्हा येथे मुक्कामी थांबले. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. व लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा दोन लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी मारोतराव गावंडे यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

शहरात सातत्याने घरफोड्या होत असून, पोलीस केवळ गुन्हा दाखल होण्यापुरतेच उरले आहेत. आतापर्यंत एकही गुन्हा उघडकीस आणता आलेला नाही. यामुळे घरफोड्यांची दहशत शहरात निर्माण झाली आहे. यावर अंकुश लावण्यात पोलिसांना सपसेल अपयश आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीRobberyचोरी