बोदेगाव येथे ज्वेलर्स फोडून तीन लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST2021-07-16T04:28:33+5:302021-07-16T04:28:33+5:30

बोदेगाव येथे बस थांबा परिसरात श्याम नामदेव मांडण रा. वरुड यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटे ...

Jewelers broke into Bodegaon and stole jewelery worth Rs 3 lakh | बोदेगाव येथे ज्वेलर्स फोडून तीन लाखांचे दागिने लंपास

बोदेगाव येथे ज्वेलर्स फोडून तीन लाखांचे दागिने लंपास

बोदेगाव येथे बस थांबा परिसरात श्याम नामदेव मांडण रा. वरुड यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी लोखंडी तिजोरी लंपास केली. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह ३०० ग्रॅम चांदीची मोड, लोखंडी तिजोरी व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल होता. चोरीचा हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे तोंड बांधून, हातात ग्लोज घालून दुकानातील तिजोरी नेत असल्याचे दिसून आले. तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल करून चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी श्वानपथक, फिंगरप्रिंट एक्सपर्टला पाचारण करण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बोदेगावला भेट दिली.

Web Title: Jewelers broke into Bodegaon and stole jewelery worth Rs 3 lakh