‘जेडीआयईटी’चा एनईसीसोबत करार

By Admin | Updated: September 28, 2016 00:36 IST2016-09-28T00:36:32+5:302016-09-28T00:36:32+5:30

उद्योगांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीमधील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (एनईसी) या कंपनीशी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने

'JediT' agreement with NEC | ‘जेडीआयईटी’चा एनईसीसोबत करार

‘जेडीआयईटी’चा एनईसीसोबत करार

स्कील डेव्हलपमेंट : कुशल मनुष्यबळ निर्मिती संस्था
यवतमाळ : उद्योगांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीमधील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (एनईसी) या कंपनीशी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्कील डेव्हलपमेंटसाठी करार केला आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधेसह २००७ मध्ये ही संस्था स्थापन झाली असून टाटा ट्रस्टने या संस्थेला ७५ टक्के अनुदान दिले आहे.
‘जेडीआयईटी’चे निवडक विभाग प्रमुख आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आॅफिसरच्या चमूने एनईसी या संस्थेला भेट दिली. या दरम्यान, एनईसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाषिश रॉय, उपाध्यक्ष के.एस. पाटील यांच्याशी स्कील डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, रिसर्च, कॅलिब्रेशन अँड टेस्टींग, बिझिनेस सर्वीसेस तसेच स्कील डेव्हलपमेंट कोर्सेसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगातील वाढती दरी कशी कमी करता येईल, यावर चर्चा झाली. या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन शाखेचे विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने आणि एनईसीच्यावतीने उपाध्यक्ष के.एस. पाटील यांनी प्रशिक्षणासाठी संयुक्त करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
करारानुसार ‘जेडीआयईटी’तील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, कॅड कॅम सीएइ प्रोग्राम, सीएनसी, व्हीएनसी प्रोग्रामींग अँड आॅपरेटींग, मेट्रॉलॉजी अँड मेटार्लजी, रोबोटिक्स अँड आॅटोमेशन, सॉफ्ट स्कील, थ्री डी पेंटींग अँड टेस्टींग आणि सॉफ्टवेअर बेस ट्रेनिंग या कोर्सेच्या ट्रेनिंगसाठी प्रत्यक्ष एनईसी नाशिक येथे जावून प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ‘जेडीआयईटी’ चमूमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचे विभाग प्रमुख डॉ. अतुल बोराडे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेचे विभाग प्रमुख डॉ. एन.बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आॅफिसर प्रा. राहुल फाळके, महाविद्यालयाचे आॅथराईज ट्रेनिंग पार्टनर, जिनॉसिस प्लसचे मॅनेजिंग पार्टनर गिरीश पाल उपस्थित होते.
या कराराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा, अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)

 

Web Title: 'JediT' agreement with NEC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.