‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

By Admin | Updated: June 12, 2017 02:02 IST2017-06-12T02:02:15+5:302017-06-12T02:02:15+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील

'Jediat' students selected in nominated company | ‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील श्याम इंडोफॅब प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. श्याम राठोड, क्षितिज झलके यांना कंपनीत मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. कंपनीद्वारे त्यांना १.८० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घोषित करण्यात आले आहे.
टेक्सटाईल उद्योग क्षेत्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या कंपनीत यापूर्वी ‘जेडीआयईटी’च्या युगा बोबडे, तेजस कापसे आणि प्रणय ढगे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कंपनीने या सत्रात दोनवेळा आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यू घेवून पाच विद्यार्थ्यांनी निवड केली आहे.
श्याम इंडोफॅबचे तांत्रिक सल्लागार प्रवीण ठोंबरे, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर सचिन यांचा आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूच्या चमूमध्ये समावेश होता. इंटरव्ह्यूमध्ये टेक्सटाईल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. यानंतर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील आतापर्यंत ८० टक्के कॅम्पस प्लेसमेंट झाले आहे. आणखी काही टेक्सटाईल जगतातील प्रमुख उद्योग समूह महाविद्यालयात कॅम्पससाठी येत आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांची दोन कंपनीत निवड झाल्यामुळे त्यांच्याकडे कंपनी निवडीसाठी पर्याय उपलब्ध आहेत.

Web Title: 'Jediat' students selected in nominated company