‘जेडीआयईटी’चा विद्यार्थी एक्सएल डायनामिक्समध्ये
By Admin | Updated: July 27, 2015 01:22 IST2015-07-27T01:22:07+5:302015-07-27T01:22:07+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी केतन फुलकर याची एक्सएल डायनामिक्स प्रा.लि.

‘जेडीआयईटी’चा विद्यार्थी एक्सएल डायनामिक्समध्ये
‘जेडीआयईटी’चा विद्यार्थी एक्सएल डायनामिक्समध्ये
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी केतन फुलकर याची एक्सएल डायनामिक्स प्रा.लि. मुंबई या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. तो महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी आहे.
कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात झालेल्या आॅफ कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयाच्या निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अॅप्टीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्यांमधून केतन फुलकर याची अंतिम निवड करण्यात आली. त्याला कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात असोसिएट अॅनालिस्ट या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. त्याला कंपनीतर्फे वार्षिक तीन लाख ५० हजार रुपयांचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे. (वार्ताहर)