‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची रेमण्ड कंपनीमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:01 IST2017-12-11T22:01:35+5:302017-12-11T22:01:51+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे.

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची रेमण्ड कंपनीमध्ये निवड
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी नितेश धैर्य याची या कंपनीत निवड झाली असून त्याला यवतमाळ येथे मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. २.५२ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज त्याला देण्यात आले आहे.
जेडीआयईटीतील अभियांत्रिकी टेक्सटाईल विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नितेश धैर्य हा पात्र ठरला. कंपनीचे व्ह्यूमन रिसोर्स मॅनेजर पातूरकर, क्वालिटी मॅनेज प्रदीप वाणी, विविंग मॅनेजर सारंग राऊत, प्रोसेसिंग मॅनेजर अविनाश महिंद्रे, डायिंग मॅनेजर प्रमोद भांडरकर यांनी इंटरव्ह्यू घेतला. टेक्निकल टेस्टनंतर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
राज्य व केंद्र सरकारच्या नव्या धारणामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी टेक्सटाईल पार्क साकारले जात आहे. वस्त्रोद्योगासंबंधी अनेक पायाभूत सुविधा राज्यात ठिकठिकाणी उपलब्ध असल्याने अनेक मोठ्या कंपन्या वस्त्रोद्योगाचा विस्तार करत आहे.