‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत
By Admin | Updated: May 16, 2015 00:10 IST2015-05-16T00:10:42+5:302015-05-16T00:10:42+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची इंदोर येथील आॅक्सीजन इन्फोलॅब्स या ...

‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची इंदोर येथील आॅक्सीजन इन्फोलॅब्स या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. यात अंतिम वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतील कुणाल कार्लेकर, कल्याणी बडकास, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतून साधना बेलेकर, शलाका महाजन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतून तन्वी खांदेडिया यांचा समावेश आहे.
इन कॅम्पस ड्राईव्हमध्ये या महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेच्या अंतिम वर्षातील निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ग्रुप डिस्कशन, टेक्नीकल इंटरव्ह्यू व एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यातून ‘जेडीआयईटी’चे पाच विद्यार्थी निवडले गेले. त्यांना कंपनीच्या इंदोर येथील कार्यालयात ट्रेनी इंजिनिअर या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. १ लाख ८० हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज त्यांना घोषित करण्यात आले. सततचा सराव आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात त्यांनी हे यश मिळविले आहे. (वार्ताहर)