‘जेडीआयईटी’चा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय परिषदेत चमकला

By Admin | Updated: April 25, 2015 23:53 IST2015-04-25T23:53:57+5:302015-04-25T23:53:57+5:30

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक लक्ष्मणराव राऊत याच्या...

JDIET students attend International Conference | ‘जेडीआयईटी’चा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय परिषदेत चमकला

‘जेडीआयईटी’चा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय परिषदेत चमकला

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक लक्ष्मणराव राऊत याच्या शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय परिषदेत उत्कृष्ट पेपरचे पारितोषिक मिळाले आहे. आयसीआरआयएसईटी (इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅन रिसेंट इनोव्हेशन इन सायन्स, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी) या बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या
परिषदेत त्याला हा बहुमान मिळाला आहे.
या परिषदेत अशोक राऊत याने ‘अ सर्वे पेपर आॅन सेक्युरिटी इन मॅनेट’ या विषयावर प्रेझेंटेशन दिले. विविध देशातील १०० लोकांचा या परिषदेत सहभाग होता. अशोकला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्याला आयटी विभागाचे प्रमुख प्रा. ए.डी. राऊत, प्रा. एम.आर. शहाडे, प्रा. पी.पी. लोकुलवार आदींचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाचे संस्था सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)

Web Title: JDIET students attend International Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.