‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी व्हीएचएम इंडस्ट्रीजमध्ये
By Admin | Updated: April 18, 2017 00:07 IST2017-04-18T00:07:53+5:302017-04-18T00:07:53+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ....

‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी व्हीएचएम इंडस्ट्रीजमध्ये
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची अमरावती येथील टेक्सटाईल पार्कमध्ये नव्याने उभारलेल्या व्हीएचएम इंडस्ट्रीज लि. या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे.
आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूतून तेजस कापसे, प्रणय ढगे, प्रणव बुराडे व लोमेश नारखेडे यांची निवड झाली आहे. व्हीएचएम इंडस्ट्रीज लि. टेक्सटाईल क्षेत्रातील प्रसिद्ध व प्रगतशील उद्योग समूह आहे. विविध प्रकारचे सुटिंग व शर्टींग बनविण्यात अग्रेसर आहे. या कंपनीचे जाळे देशभरात पसरले आहे. आॅफ कॅम्पस इंटरव्हूच्या चमूमध्ये कंपनीचे व्यवस्थापक (ह्यूमन रिसोर्स) गिरीश देशपांडे आदींची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांची टेक्नीकेल टेस्ट घेण्यात आली. यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांनी अंतिम निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना वार्षिक १.८० लाख रुपये एवढे पॅकेज देण्यात आले. (वार्ताहर)