जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीत परिसंवाद
By Admin | Updated: September 9, 2015 02:48 IST2015-09-09T02:48:56+5:302015-09-09T02:48:56+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे परिसंवाद सत्र घेण्यात आले.

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीत परिसंवाद
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे परिसंवाद सत्र घेण्यात आले. मार्गदर्शक म्हणून एटीई एंटरप्राईजेस प्रा.लि. मुंबई या नामांकित टेक्सटाईल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, व्यवस्थापक जयंत नगराळे लाभले होते. टेक्सटाईल उद्योगात होणारी वाढ, तत्सम नोकरी, व्यवसायाच्या संधी याशिवाय विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य विकसित करण्यासोबतच व्यक्तिमत्त्व विकासावर त्यांनी मार्गदर्शन केले.
माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मंचावर मार्गदर्शकांसह इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने, टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. अतुल बोराडे, कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले आदी उपस्थित होते. देशातील उत्पादनात टेक्सटाईल उद्योगांचा वाटा सर्वाधिक आहे. देशातील आर्थिक व्यवस्थेला पाठबळ देण्याचे काम हा उद्योग करत असल्याचे लक्ष्मीकांत राठी यांनी सांगितले. जयंत नगराळे यांनी मॉडर्न स्पिनिंग टेक्नॉलॉजीविषयी मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. दीपक उबरहंडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, अनंत इंगळेकर, सुरभी परळीकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी विक्रमजित सिंग, मयूर उजवणे, उमेश पाटील, गजानन कदम, दीपाली राठोड, पूजा महल्ले, नगमा खान, श्याम शेंदूरकर, प्रियंका सानप, सायली देव, दीपाली मुंडलीक, तृप्ती पाठक, क्षितिज झळके आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)