पारवा येथे जलतनाआड सागवान तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:48 IST2017-08-25T21:46:49+5:302017-08-25T21:48:31+5:30
जलतनाआड वाहतूक केले जाणारे ५४ हजारांचे सागवान गुरुवारी रात्री येथे पकडण्यात आले. पारवा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या चमूने ही कारवाई केली.

पारवा येथे जलतनाआड सागवान तस्करी
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : जलतनाआड वाहतूक केले जाणारे ५४ हजारांचे सागवान गुरुवारी रात्री येथे पकडण्यात आले. पारवा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या चमूने ही कारवाई केली.
कुर्ली येथून नागपूरकडे जात असलेल्या जलतनाच्या ट्रकविषयी (एम.एच.३१/एपी-५८६५) वनअधिकाºयांना संशय आला. चौफुलीवर थांबविण्यात आला. वनवसाहतीमध्ये जलतन उतरविण्यात आले. त्यात दोन मीटर सागवान आढळले. या सागवानाची किंमत ५३ हजार ८८१ रुपये असल्याचे वनअधिकाºयांनी सांगितले. ट्रक जप्त करून चालक पवन जाधव (रा.पुसद) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एम.के. आडे यांच्यासह क्षेत्र सहायक एस.व्ही. गावार्ले, यू.बी. अनाढे, के.एन. पवार, टी.डी. हेमके यांनी पार पाडली.