शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:26 IST

केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळ येथील जयस्वाल दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Kedarnath Helicopter Crash: रविवारी पहाटे केदारनाथजवळील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी ०५:१७ वाजता, आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी ६ भाविक आणि पायलटसह उड्डाण केले होते. खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर जंगलात कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे सातही जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात महाराष्ट्रातील जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला.

केदारनाथ येथे झालेल्या हेलीकॉप्टर दुर्घटनेत वणीतील तिघांचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल (४१), श्रद्धा जयस्वाल (३२) व काशी जयस्वाल (२ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची वार्ता वणी शहरात पोहोचताच, सर्वत्र शोककळा पसरली. १२ जून रोजी काही नातलगांसोबत राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल व मुलगी काशी जयस्वाल हे तिघेजण अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. शनिवारपर्यंत परिसरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेऊन हे दाम्पत्य हेलिकॉप्टरने अन्य काही भाविकांसोबत केदारनाथकडून रविवारी पहाटे निघाले होते. 

यादरम्यान सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास केदारनाथ परिसरातील गौरीकुंड ते सोनप्रयाग या भागात खराब वातावरणामुळे हेलीकॉप्टर जंगलात कोसळले. या अपघातात हेलीकॉप्टरमधील सातजण जागीच ठार झाले. त्यात वणीतील जयस्वाल कुटुंबाचाही समावेश आहे. रविवारी पहाटे या घटनेची माहिती मिळताच जयस्वाल यांच्या नातलग व मित्रपरिवाराने घरासमोर एकच गर्दी केली. जयस्वाल दाम्पत्यासह दोन वर्षाच्या काशीच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. मागीलवर्षी राजकुमार जयस्वाल यांच्या पुढाकारात वणीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मोठे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

"आज सकाळी केदारनाथहून गुप्तकाशीला जाताना उत्तराखंडमधील गौरीकुंडजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यामुळे खूप दुःख झाले आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचाही समावेश होता. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. आम्ही सर्व बाधितांच्या पाठीशी आहोत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :KedarnathकेदारनाथAccidentअपघातYavatmalयवतमाळ