जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण सोहळा

By Admin | Updated: May 4, 2015 00:03 IST2015-05-04T00:03:22+5:302015-05-04T00:03:22+5:30

जैन सोशल ग्रुपचा दहावा पदग्रहण सोहळा मंगळवारी येथे पार पडला. नवकार मंत्र पठनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Jain Social Group's accession ceremony | जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण सोहळा

जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण सोहळा

यवतमाळ : जैन सोशल ग्रुपचा दहावा पदग्रहण सोहळा मंगळवारी येथे पार पडला. नवकार मंत्र पठनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नेपाळ आणि उत्तर भारतात भूकंपातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसन्न दप्तरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमणीकभाई देसाई आदी उपस्थित होते.
सन २०१५-१६ च्या कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून नवनीतभाई शाह यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष भावीन सेठ यांनी त्यांच्या कार्यकाळातील अहवाल सादर केला. प्रसंगी विविध प्रकल्प निदेशकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवनियुक्त अध्यक्ष शाह यांना संस्थेचे चार्टर प्रदान करण्यात आले.
अध्यक्ष नवनीत शाह यांनी कार्यकारिणी जाहीर केली. यात उपाध्यक्ष अतुल धोराजीवाला, सचिव गणेश देसाई, कोषाध्यक्ष जिग्नेश पिपरिया, प्रेसिडेंट इलेक्ट बकुळभाई दोशी, पीआरओ दर्शन कोठारी, सहसचिव जितेश बाखडा, हितेश दोशी, भूषण पिपरिया, भावेश सेठ, आशा दोशी, काजल पिपरिया, दीप्ती सेठ यांचा समावेश आहे.
सोबतच जैन संगिनी ग्रुपच्या अध्यक्षपदी आरतीबेन पिपरिया यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी रंगारंग नृत्य सादर केले. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Jain Social Group's accession ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.