जैन धर्मगुरू विजयराजजी म.सा. यांचा यवतमाळात मंगल प्रवेश
By Admin | Updated: March 6, 2017 01:26 IST2017-03-06T01:26:12+5:302017-03-06T01:26:12+5:30
होळी चातुर्मासानिमित्त जैन धर्मगुरू आचार्य भगवंत प.पू. १००८ श्री विजयराजजी म.सा. यांचा रविवारी सकाळी यवतमाळात मंगल प्रवेश झाला.

जैन धर्मगुरू विजयराजजी म.सा. यांचा यवतमाळात मंगल प्रवेश
यवतमाळ : होळी चातुर्मासानिमित्त जैन धर्मगुरू आचार्य भगवंत प.पू. १००८ श्री विजयराजजी म.सा. यांचा रविवारी सकाळी यवतमाळात मंगल प्रवेश झाला. त्यांचा मंगलपाठ येथील राजेंद्रनगरातील निसर जैन धर्मस्थानकात दररोज दुपारी ३ वाजता राहील. तसेच दररोज सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात त्यांचे प्रवचन होणार आहे.
नागपूर मार्गावरील आरटीओ कार्यालयाजवळून कळंब चौक, टांगा चौक, पाचकंदील चौक, हनुमान आखाडा चौक, स्टेट बँक चौक ते निसर जैन धर्मस्थानकात भक्तांच्या उपस्थितीत त्यांचा मंगल प्रवेश झाला. त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक आदी प्रांतातून भक्तांची उपस्थिती होती.
यावेळी आचार्यांनी मार्गदर्शन केले. सर्वांच्या हिताकरिता कृषी प्रधान, ऋषीप्रधान ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळेच आपली संस्कृती सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. संचालन श्री संघाचे प्रवक्ता जितेंद्र गेलडा यांनी केले. यावेळी वरिष्ठ श्रावक, श्राविकांची उपस्थिती होती, असे श्री संघाचे अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र खिवसरा यांनी कळविले आहे. मंगलपाठ आणि प्रवचनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री संघातर्फे करण्यात आली आहे. (वार्ताहर)