इसापूरचा श्याम चढला पुन्हा टॉवरवर

By Admin | Updated: April 21, 2016 02:48 IST2016-04-21T02:48:35+5:302016-04-21T02:48:35+5:30

इसापूर येथील शासकीय ई-क्लास जमिनीवर रूई तलाव येथील आदिवासींना भूखंड देण्याच्या मागणीसाठी श्याम गायकवाड हा तरुण मंगळवारी मध्यरात्री येथील...

Isapur of Shyam was up again to the tower | इसापूरचा श्याम चढला पुन्हा टॉवरवर

इसापूरचा श्याम चढला पुन्हा टॉवरवर

तहसील कार्यालय : आदिवासींना जागेची मागणी
दिग्रस : इसापूर येथील शासकीय ई-क्लास जमिनीवर रूई तलाव येथील आदिवासींना भूखंड देण्याच्या मागणीसाठी श्याम गायकवाड हा तरुण मंगळवारी मध्यरात्री येथील तहसीलच्या टॉवरवर जाऊन चढला. टॉवरवर चढून आंदोलन करण्याची श्यामची ही पाचवी वेळ असून तळपत्या उन्हात केवळ सोबत नेलेल्या झेंड्याच्या आधाराने तो दिवसभर टॉवरवर बसून होता.
टॉवरवर चढून प्रशासनाची भंबेरी उडविणारा श्याम पुन्हा टॉवरवर चढल्याचे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लक्षात आले. यावेळी तो दिग्रस तहसील कार्यालयाच्या टॉवरवर जाऊन चढला आहे. श्यामने आपल्या सोबत झेंडे, पिण्याचे पाणी नेले आहे. आपल्या आंदोलनाबाबत श्यामने टॉवरवरून मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले पत्र टाकले. त्यात रूई तलाव येथील आदिवासींना भूखंडाची मागणी केली आहे. आज दिवसभर तो तळपत्या उन्हात टॉवरवर बसून होता. सोबत नेलेल्या तीन झेंड्यांच्या सावलीत तो टॉवरवर बसून होता. प्रशासनाने त्याला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. वृत्त लिहेस्तोवर टॉवरवरच बसू होता. विशेष म्हणजे श्यामने ७ जुलै २०१४ व २९ आॅक्टोबर २०१५ रोजी पोलीस ठाण्याच्या टॉवरवर चढून आंदोलन केले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०१५ रोजी तहसीलदारांच्या कक्षात कोंडून घेतले होते. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला तर ८ जानेवारी २०१६ रोजी श्याम येथील पंचयात समितीच्या झाडावर चढून बसला होता. बुधवारी पुन्हा तो येथील तहसील कार्यालयात असलेल्या पवन ऊर्जा टॉवरवर चढून बसला आहे. प्रशासन त्याच्या आंदोलनाची कशा प्रकारे दखल घेते आणि त्याच्या मागण्या मान्य होतात काय, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Isapur of Shyam was up again to the tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.