लाडखेडजवळ अपघाताचे निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST2021-06-19T04:27:35+5:302021-06-19T04:27:35+5:30
लाडखेड : दारव्हा ते यवतमाळ रस्त्यावर लाडखेडजवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असून ...

लाडखेडजवळ अपघाताचे निमंत्रण
लाडखेड : दारव्हा ते यवतमाळ रस्त्यावर लाडखेडजवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असून येथे वाहनांना अपघाताचे निमंत्रण मिळत आहे.
हा मार्ग अतिशय रहदारीचा आहे. या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहनांची रहदारी असते. लाडखेडलगत पुलाचे बांधकाम केले जात आहे. त्यात घरगुती कामासाठी वापरल्या जाणा-या लोखंडी सळया वापरल्या जात आहे. सहा आणि १२ एमएमच्या सळया लावलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात कधीही पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ बांधकाम अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन बांधकाम थांबवून चौकशी करण्याची गरज आहे. अंदाजपत्रकानुसार काम करून द्यावे आणि काम करणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी लाडखेडकर करीत आहे. दारव्हा ते यवतमाळ रस्त्यावर अनेक ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात आले. तेसुद्धा याच पद्धतीचे झाल्याची ओरड होत आहे.