बळीराजा चेतना अभियानातील गैरव्यवहाराची चौकशी
By Admin | Updated: February 6, 2017 00:09 IST2017-02-06T00:09:50+5:302017-02-06T00:09:50+5:30
बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून

बळीराजा चेतना अभियानातील गैरव्यवहाराची चौकशी
यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणी आता जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यासाठी संबंधित तलाठ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. या निधीतून गावातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची तरतूद करण्यात आली होती. शेतकऱ्यांशिवाय गावातील इतरही घटकांना या निधीतून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. मात्र मदत देताना दुजाभाव केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाने संबंधित तलाठ्यांंना नोटीस बजावली आहे. यातून मोठे घबाड हाती घेण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याशी संपर्क साधला असता निधी वितरणाच्या यादीवर तलाठ्यांची स्वाक्षरी असल्याने नेमके काय घडले याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)