चुरमुरा खदानीतील अवैध उत्खननाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:33 IST2018-03-16T23:33:51+5:302018-03-16T23:33:51+5:30
गिट्टी खदानीसाठी महसूल विभागाने दिलेल्या तालुक्यातील चुरमुरा येथील ई-वर्ग जमिनीसोबतच वन विभागाच्या जमिनीवर अवैध उत्खनन करण्याचा प्रकार उघडकीस आला असून.....

चुरमुरा खदानीतील अवैध उत्खननाची चौकशी
ऑनलाईन लोकमत
उमरखेड : गिट्टी खदानीसाठी महसूल विभागाने दिलेल्या तालुक्यातील चुरमुरा येथील ई-वर्ग जमिनीसोबतच वन विभागाच्या जमिनीवर अवैध उत्खनन करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाची वन विभागाने दखल घेतली असून यवतमाळच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी गुरुवारी या खदानीची पाहणी करून चौकशी केली. विशेष म्हणजे या अवैध उत्खनन प्रकरणी यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते.
उमरखेड तहसील कार्यालयाने काही वर्षापूर्वी चुरमुरा येथे गिट्टी खदानीसाठी ई-वर्ग जमीन लिज तत्वावर दिली होती. मात्र या व्यतिरिक्त वन विभागाची जमीन बळकावून संबंधित खदान मालकाने तेथे उत्खनन केले होते. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे गौण खनिज वापरण्यात आले.
याबाबत योग्य कारवाई करण्यासाठी राजेश खंदारे व राजेश मुडे यांनी यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत चौकशीचे आश्वासन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने वन विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली. विभागीय वन अधिकारी (दक्षता)चे पी.बी. राठोड यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी चुरमुरा येथे आले. महसूल व वन विभागाच्या सिमेची चाचपणी केली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून उत्खनन झालेल्या जागेचे मूल्यांकन प्राप्त होताच नुकसानीची रक्कम संबंधितांकडून वसूल करू असे चौकशी अधिकाºयांनी सांगितले. आता या प्रकरणी किती दंड होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.