मातंग बांधवांवरील हल्ल्याचा निषेध

By Admin | Updated: December 20, 2015 02:36 IST2015-12-20T02:36:49+5:302015-12-20T02:36:49+5:30

मातंग बांधवांवर नागपुरात झालेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद येथे उमटले. स्थानिक समाजबांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून झालेल्या अन्यायाचा निषेध नोंदविला.

Invasion of Matang brothers | मातंग बांधवांवरील हल्ल्याचा निषेध

मातंग बांधवांवरील हल्ल्याचा निषेध

पडसाद : दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा
यवतमाळ : मातंग बांधवांवर नागपुरात झालेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद येथे उमटले. स्थानिक समाजबांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून झालेल्या अन्यायाचा निषेध नोंदविला. दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास निषेध मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
लोकस्वराज्य संघटनेचे भरांडे यांच्या नेतृत्त्वात नांदेड ते नागपूर विधानभवन असा ‘लाँगमार्च’ काढण्यात आला. अनुसूचित जाती प्रवर्गातील घटकांना न्याय द्यावा आणि मातंग समाजाच्या उत्कर्षासाठी उपाययोजना व्हावी याकरिता ‘लहू आयोग’ स्थापन करावा या मागणीसाठी विधानभवनाकडे निघालेल्या मोर्चावर लाठीचार्ज करण्यात आला. या प्रकारात महिला आणि लहान मुलेही जखमी झाले. या प्रकाराचा येथे निषेध नोंदविण्यात आला.
येथील समाजबांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली. सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. नवनीत महाजन, ज्ञानेश्वर कळणे, पुंडलिक वानखडे, विनोदराव तेलंगे, देवेंद्र वानखडे, सागर कळणे, विवेक वानखडे, विनित कळणे, विशाल तेलंगे, किशोर शिंदे, अनिल तेलंगे, नरेश खंडारे, प्रकाश कळणे, राजू पाटील, घनश्याम हटकर, गोविंद तेलंगे, महेश खंडारे, बालू कसारे आदींनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सरकार आणि पोलीस विभागाचा निषेध नोंदविला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (शहर वार्ताहर)

Web Title: Invasion of Matang brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.