हल्लेखोर वानर वनविभागाच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:11+5:30
वानराच्या टोळ्यांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत सदर हल्लेखोर वानर आक्रमक झाले होते. त्यातून ते नागरिकांवर हल्ला करित होते. त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लोकवस्तीतील एका घराच्या टेरेसवरून सदर वानराला बेशुद्ध करून पकडले.

हल्लेखोर वानर वनविभागाच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहरातील मानवी वस्त्यांमध्ये शिरून हल्ले करणाऱ्या वानराला जेरबंद करण्यात अखेर शनिवारी वनविभागाला यश आले.
५ जानेवारी रोजी या वानराने पांढरकवडा शहरातील एका छोट्या मुलीवर हल्ला करून तिला जखमी केले होते. वानराच्या टोळ्यांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत सदर हल्लेखोर वानर आक्रमक झाले होते. त्यातून ते नागरिकांवर हल्ला करित होते. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने त्या वानराच्या हालचालींवर पाळत ठेवली. त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लोकवस्तीतील एका घराच्या टेरेसवरून सदर वानराला बेशुद्ध करून पकडले. यासाठी अमरावती, यवतमाळ व पुसद येथून रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले होते. या चमूला स्थानिक वनविभागाच्या पथकाने मदत केली. सुरक्षीतस्थळी नेऊन या वानराला पुन्हा शुद्धीवर आणून जंगलात सोडण्यात आले.