पुसद येथे आंध आदिवासी समाज परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:38 IST2018-02-08T21:37:58+5:302018-02-08T21:38:13+5:30
येथील आदिवासी कर्मचारी संघटनेच्यावतीने आंध आदिवासी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन राजे उदाराम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन समाज सेवक मारोतराव वंजारे यांच्या हस्ते करण्यात आले.

पुसद येथे आंध आदिवासी समाज परिचय मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील आदिवासी कर्मचारी संघटनेच्यावतीने आंध आदिवासी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन राजे उदाराम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन समाज सेवक मारोतराव वंजारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मारोतराव वंजारे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरिभाऊ फुपाटे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी रंगराव काळे, सेवानिवृत्त ठाणेदार वाघुजी खिल्लारे, शामराव व्यवहारे, श्रीराम अंभोरे, नारायण कºहाळे, रामकृष्ण चौधरी, ज्ञानेश्वर तडसे, आशाताई पांडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन उघडे, ज्योतीताई चिरमाडे, पंचायत समिती सदस्य गजानन फोपसे, संगीता बोके, सेवानिवृत्त कामगार आयुक्त एकनाथ फुपाटे, भीमराव पोले, बापूराव वाकोडे, संगीता माहुरे, विजयमाला रिठे, आरोग्य सभापती भानूदास राजने, सुरेश धनवे, गणपत गव्हाळे उपस्थित होते.
यावेळी उत्पादन शुल्क निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल नामदेव इंगळे, सेवानिवृत्तीबद्दल ठाणेदार वाघुजी खिल्लारे, सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेल्या संगीता माहुरे, पोलीस उपनिरीक्षक विजयमाला रिठे, वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. हरिभाऊ फुपाटे, युपीएससी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरल्याबद्दल राहुल हजारे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, आप्पाराव घुक्से, पुंडलिक टारफे, किरण मिरासे, रमेश उमाटे, फकीरराव जुमनाके, राजेश ढगे, भास्कर मुकाडे, संजय भिसे, सुखदेव काळे, लक्ष्मण नांदे, शिवाजी मारकड, किसन भुरके, रामप्रसाद उघडे, नामदेव बोके, शंकर माहुरे, संतोष माघाडे, केशव बोरीकर, भगवान गुव्हाडे, मोतीराम वाघमारे, गजानन वंजारे, संजय बुरकुले, बबन काळे, तुकाराम खुपसे, रामराव जंगले, विवेक खेकाळे, नारायण मुरमुरे, नारायण सोनुळे, खंडबाराव नाटकर उपस्थित होते. प्रास्ताविक भास्कर मुकाडे यांनी, संचालन किसन भुरके व अश्विनी बुरकुले यांनी तर आभार सुखदेव कांबळे यांनी मानले.