शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा; ५० हजारांचे बक्षीस देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:36 IST

Yavatmal : तालुकास्तर, जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावरही शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगामातील पीक स्पर्धेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचा आहे. यात विजेत्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे.

ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात चालान भरावे लागणार आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी ३०० रुपये, तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांना १५० रुपयांचे चालान भरावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची स्वतःच्या नावाने जमीन असणे आवश्यक आहे. ती जमीन स्वतः कसणे आवश्यक आहे. एकावेळी एका शेतकऱ्याला विविध पिकांच्या स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे. या स्पर्धेसाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 

ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर राबविली जाणार आहे. यात प्रत्येक स्तरावर शेतकऱ्यांना तीन विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. शेतशिवारामध्ये अधिक उत्पन्न घेण्यासाठी विविध क्षेत्रात विविध पद्धतीचा अवलंब केला जातो. यातून अनेकांना लाभ होतो, तर काहींना तोटाही होतो. यातील योग्य पद्धती कोणती आहे, याची माहिती स्पर्धा राबविल्यामुळे सर्वांनाच कळणार आहे. याशिवाय अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना स्पर्धा राबविल्यामुळे प्रोत्साहन मिळून असे शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून बदलण्यास मदत होईल. सोबतच कमी खर्चाच्या आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या बाबीदेखील शेतकऱ्यांना कळतील. 

तालुका ते राज्यस्तरावर होणार स्पर्धाया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे दिली जाणार आहेत. यात संबंधित सातबाऱ्यावर घोषित केलेल्या क्षेत्रावर तसे पीक असणे आवश्यक आहे.

प्रोत्साहन अन् प्रसिद्धीही कृषी वार्ता फलकावर याची माहिती दिली जात आहे. शेतकरी गट आणि कृषी सहायकाच्या माध्यमातूनही गावपातळीवर ही माहिती देण्यात आली आहे.

एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी कुठले तंत्र वापरले, याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

३१ डिसेंबरपर्यंतची मुदत योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज कुठे करणार? शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात अर्ज भरायचा आहे. सोबत सातबारा, आठ-अ, चालान, आधार कार्ड जोडायचे आहे. आदिवासी असेल तर जातप्रमाणपत्र लागणार आहे.

किती रुपयांचे बक्षीस आहे तालुकास्तरावर ५, ३, २ हजारांची तीन बक्षिसे, जिल्हास्तरावर १०, ७, ५ अशी तीन, तर राज्यस्तरावर ५०, ४०, ३० अशी बक्षिसे असणार आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळFarmerशेतकरी