लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँक डिटेल्सची कुठलीही माहिती न मिळविता ऑनलाईन ट्रान्झेक्शनद्वारे खात्यातून पैसे उडविणारी हॅकर्सची टोळी अवधूतवाडी पोलिसांनी जेरबंद केली. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच दहा दिवसात आरोपींना शोधून अटक केली. ही कामगिरी सायबर एक्सपर्ट सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावल यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण केली.विवेकानंद सोसायटीत राहणारे शिक्षक सूर्या अजय शुक्ला यांचे बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर दोन लाख ५७ हजार ३०६ रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघड झाला. शुक्ला यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यांच्याकडे अॅक्सीस बँकेचे क्रेडीट कार्ड होते. मात्र या कार्डाची कुठलीही डिटेल त्यांनी शेअर केले नाही. त्यानंतरही या हॅकर्सने थेट बँकेच्या फायरवॉलवरून माहिती गोळा करत परस्पर रक्कम उडविली. हा गुन्हा सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावल यांच्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला. ठाणेदार आनंद वागदकर यांनी त्यांच्या मदतीसाठी प्रदीप कुऱ्हाडकर, सुधीर पुसदकर या दोन शिपायांची नेमणूक केली. या पथकाने दहा दिवसातच हा गुन्हा उघड केला. त्यात सागर प्रदीप शेट्टी (२१) रा.३७, लक्ष्मीनगर, गल्लामंडी, बर्खिडी, जहागिराबाद, भोपाल (मध्यप्रदेश) याच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. या टोळीने बँकेचे फायरवॉल हॅक करून परस्पर फ्लिपकार्टद्वारे वस्तूंची आॅनलाईन खरेदी केली. यात एक अॅप्पल कंपनीचा मॅक बूक लॅपटॉप, अॅप्पल कंपनीचा मोबाईल, अॅप्पल कंपनीचा एअरपॉड्स, सॅमसंगचा ब्ल्यू टूथ की, सॅमसंग नोट मोबाईल, अर्मानी कंपनीचे घड्याळ असा दोन लाख ५७ हजार ३०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपींकडून स्पाईस मोबाईल, सॅमसंग नोट मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा दोन लाख ९३ हजार ३०६ रुपयांचा मुद्देमाल परत मिळविला.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कामगिरीत सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, जमादार नासीर शेख, सायबर सेलमधील दिगांबर पिलावन यांनीही सहभाग घेतला.
हॅकर्सची आंतरराज्यीय टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST
विवेकानंद सोसायटीत राहणारे शिक्षक सूर्या अजय शुक्ला यांचे बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर दोन लाख ५७ हजार ३०६ रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघड झाला. शुक्ला यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यांच्याकडे अॅक्सीस बँकेचे क्रेडीट कार्ड होते. मात्र या कार्डाची कुठलीही डिटेल त्यांनी शेअर केले नाही. त्यानंतरही या हॅकर्सने थेट बँकेच्या फायरवॉलवरून माहिती गोळा करत परस्पर रक्कम उडविली.
हॅकर्सची आंतरराज्यीय टोळी जेरबंद
ठळक मुद्देअवधूतवाडी पोलिसांची कारवाई : बँकेची फायरवॉलच करतात हॅक