आंतरपिकातून युवकाला गवसली समृध्दीची दिशा

By Admin | Updated: December 14, 2015 02:33 IST2015-12-14T02:33:06+5:302015-12-14T02:33:06+5:30

युवावर्ग आज शेतीपासून दूर चालला आहे. यासाठी विविध कारणे सांगितली जातात. ही कारणे बऱ्याचअंशी साधारही आहे.

From the Interpix, the direction of direction of prosperity to the youth | आंतरपिकातून युवकाला गवसली समृध्दीची दिशा

आंतरपिकातून युवकाला गवसली समृध्दीची दिशा

खूणगाठ : कळंबमध्ये झाले तूर बियाणे विकसित, चिकाटी आणि परिश्रमाची जोड
गजानन अक्कलवार कळंब
युवावर्ग आज शेतीपासून दूर चालला आहे. यासाठी विविध कारणे सांगितली जातात. ही कारणे बऱ्याचअंशी साधारही आहे. पण काहींनी यावरही मात करत साधलेली प्रगती इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. यातीलच एक म्हणजे, कळंब येथील दीपक रामदास गोरे होय. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कल्पकतेतून त्याने कृषी क्षेत्रात घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे.
दीपक गोरे या ३२ वर्षीय युवकाचे शिक्षण एम.कॉमपर्यंत झाले. नोकरीच्या मागे न धावता त्याने शेतीचा व्यवसाय करण्याची खुनगाठ मनाशी बांधली. बहुतेक शेतकरी कापूस, सोयाबीन या पारंपरिक पिकाची लागवड करतात. परंतु दीपकने यावर्षी आपल्या दहा एकर शेतात केवळ तुरीची लागवड केली. विशेष म्हणजे तुरीचे बियाणे विकत न आणता घरचेच वापरले. एक बाय नऊ फुटावर लावण्यात आलेल्या तुरीमध्ये आंतरपीक म्हणून मधुमक्काचे पीक घतले. यातुन त्याला ६० हजार रुपयाचे उत्पन्न झाले. आता तुर कापणीच्या मार्गावर आहे. तत्पूर्वी त्याने एकदा तुरीची छाटणी केली. त्यामुळे तुरीचे झाड बहरले. आता तूर इतकी लदबदून गेली आहे की, ती चक्क जमिनीला टेकली. एकरी १० क्विंटलवर तूर होण्याचा अंदाज त्याला आहे. एवढे उत्पादन झाल्यास त्याला आजच्या बाजारभावानुसार जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
तूर पिकासाठी त्याने कुठल्याही रासायनिक खताचा वापर केलेला नाही. केवळ दोनदा फवारणी केली. असे असताना किडीचा कुठलाही प्रादुर्भाव नसल्याचा दावा दीपकने केला आहे. त्याने यापूर्वी शेतीत विविध प्रयोग केले. त्यातून फायदाही मिळाला. त्यामुळे त्याने यावर्षी केवळ तूर या पीकाची सलग लागवड केली. कपाशी व सोयाबीनपेक्षाही कमी खर्चाचे तूर पीक आहे. मजुरीचा खर्चही कमी लागतो. त्यामुळे त्याने या पिकाला प्राधान्य दिले.
दीपकने तुरीचे वाण विकसित केले आहे. त्याच्या शेतातील तुरीच्या शेंगा लालसर तांबड्या आहे. पाच ते सात दाण्याची ही शेंग आहे. दानाही टपोरा आहे. काही गुंठे जागेवर ही तूर लावण्यात आली आहे. पुढील हंगामातही हीच तूर बियाणे म्हणून वापरणार असल्याचे त्याने सांगितले.

Web Title: From the Interpix, the direction of direction of prosperity to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.