चिमुकल्या विवेकचा प्रामाणिकपणा
By Admin | Updated: July 17, 2016 00:51 IST2016-07-17T00:50:31+5:302016-07-17T00:51:02+5:30
येथील अणे विद्यालयात पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विवेक अशोक सायरे या विद्यार्थ्याला मोबाईल गवसला.

चिमुकल्या विवेकचा प्रामाणिकपणा
यवतमाळ : येथील अणे विद्यालयात पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विवेक अशोक सायरे या विद्यार्थ्याला मोबाईल गवसला. त्याने तो मोबाईल वडगाव पोलीस ठाण्यात जमा करून प्रामाणिकतेचा परिचय दिला.
विवेकला शाळा सुटल्यानंतर एक मोबाईल गवसला. तो सुरू असल्याचे त्याला जाणवले. त्याने अशाप्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी, असे ऐकले होते. त्याचा स्वभाव मुळातच धीट. त्याने तडक वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. तेथे मोबाईल सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते व सहकाऱ्यांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी त्याचवेळी एका चोरट्याला ठाण्यात आणले होते. त्याला पोलिसांनी ‘चिमुकल्या विवेककडून काही शिका’ असा सल्ला दिला. विवेकच्या प्रामाणिकपकणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (शहर वार्ताहर)