ढाणकी येथे दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:56 IST2021-02-27T04:56:12+5:302021-02-27T04:56:12+5:30
दिव्यांग व्यक्तींना सुद्धा समाजात ताठ मानेने जगावे, त्यांनी आपल्या पायावर उभे राहून स्थान निर्माण करावे, या हेतूने शासन ...

ढाणकी येथे दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक
दिव्यांग व्यक्तींना सुद्धा समाजात ताठ मानेने जगावे, त्यांनी आपल्या पायावर उभे राहून स्थान निर्माण करावे, या हेतूने शासन वेळोवेळी योजना राबवत असते. मात्र, काही कर्मचारी योजनांना तिलांजली देतात. दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे खच्चीकरण करतात. येथे नगरपंचायतमध्ये काही कामासाठी गेलेल्या दिव्यांग बांधवांना ऑपरेटरने शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. संतप्त दिव्यांगांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित ऑपरेटरला निलंबित करण्याची मागणी केली.
सदर ऑपरेटर नेहमी आपल्या वागणुकीमुळे चर्चेत असतो. तो स्वतः नगराध्यक्ष असल्यासारखं राहतो. अशा उर्मट ऑपरेटरवर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी प्रहार दिव्यांग संघटना मार्फतही निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष शे. मुजमिल, शाम शिराळे, चंद्रशेखर तोटेवाड, गोविंद सल्लेवाड व दिव्यांग बांधव उपस्थित होते.