अवैध धंद्यांवर पायबंद घालण्याचे निर्देश

By Admin | Updated: February 1, 2016 02:18 IST2016-02-01T02:18:50+5:302016-02-01T02:18:50+5:30

पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल भवन येथे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अवैध धंद्यांवर पायबंद घालण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Instructions for locking down illegal businesses | अवैध धंद्यांवर पायबंद घालण्याचे निर्देश

अवैध धंद्यांवर पायबंद घालण्याचे निर्देश

आढावा बैठक : जिल्ह्यातील आमदार व खासदारांची उपस्थिती
यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल भवन येथे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अवैध धंद्यांवर पायबंद घालण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला खा.भावना गवळी, आमदार सर्वश्री माणिकराव ठाकरे, संदीप बाजोरीया, मनोहर नाईक, मदन येरावार, डॉ.अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजु तोडसाम, जिल्ह्याचे पालक सचिव व्ही.गिरीराज, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत सुरू राहता कामा नये. असे प्रकार कुठे आढळून आल्यास त्यावर त्वरीत पायबंद लावण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी पोलिस अधिक्षकांना दिले. पोलिस कर्मचा?्यांकडून सामान्य मानसास आपलुकीची व सन्मानाची वागणूक दिली जावी, असेही ते म्हणाले. वाहतुक व्यवस्था जिल्ह्यात सर्वत्र सुरळीत राहावी व त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Instructions for locking down illegal businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.