घरकुलाचा पहिला हप्ता वितरणाचे निर्देश

By Admin | Updated: March 23, 2015 00:09 IST2015-03-23T00:09:30+5:302015-03-23T00:09:30+5:30

सर्वांसाठी घरे या उद्देशाने शासन घरकुलाची योजना राबवित आहे. त्यामुळे इंदिरा आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने पहिल्या हप्त्याच्या ...

Instructions for the first installment of the house | घरकुलाचा पहिला हप्ता वितरणाचे निर्देश

घरकुलाचा पहिला हप्ता वितरणाचे निर्देश

यवतमाळ : सर्वांसाठी घरे या उद्देशाने शासन घरकुलाची योजना राबवित आहे. त्यामुळे इंदिरा आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने पहिल्या हप्त्याच्या अनुदानाचे वितरण करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केल्या.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बागळे, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पिंपळे तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात या वर्षासाठी १४ हजार ६५१ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी १० हजार ८२१ घरकुलांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. उर्वरित घरकुलांचा हप्ता तातडीने वितरित करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत डॉ.कलशेट्टी यांनी केल्या. अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. यासाठी काही अडचण असल्यास ती तातडीने दूर करण्यात येईल, असे यावेळी अग्रणी बँंकेचे व्यवस्थापक पिंपळे यांनी सांगितले.
यावेळी तालुकानिहाय इंदिरा आवास तसेच रमाई आवासच्या घरकुलांचा आढावा घेण्यात आला. पुढील वर्षातील घरकूल लाभार्थ्यांच्या आॅनलाईन नोंदी तसेच राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना व मागासक्षेत्र अनुदान निधीतील कामांची आढावाही यावेळी घेण्यात आला. तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुलाचा पाठपुरावा करण्याबाबत सूचनाही करण्यात आल्या. यावेळी डीआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Instructions for the first installment of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.