अमोलकचंद महाविद्यालयाची ‘नॅक’तर्फे पाहणी
By Admin | Updated: October 20, 2016 01:40 IST2016-10-20T01:40:43+5:302016-10-20T01:40:43+5:30
यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाच्या येथील अमोलकचंद महाविद्यालयाला ‘नॅक’ मूल्यांकन समितीने भेट दिली.

अमोलकचंद महाविद्यालयाची ‘नॅक’तर्फे पाहणी
यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाच्या येथील अमोलकचंद महाविद्यालयाला ‘नॅक’ मूल्यांकन समितीने भेट दिली. या समितीचे चेअरमन पश्चिम बंगालमधील वर्धमान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.स्मुतीकुमार सरकार होते. हैदराबाद येथील डॉ.आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक व समन्वयक डॉ.यू.सुब्बाराव, छत्तीसगढच्या उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ.पी.सी. चौबे यांचा समितीत समावेश होता.
प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा, नॅक समन्वयक, विविध विषयांच्या संबंधित प्राध्यापकांनी आणि विभाग प्रमुखांनी समितीला आवश्यक ती माहिती दिली. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रकाश चोपडा, संचालक किशोर दर्डा, कीर्ती गांधी, अॅड.दर्डा, भोयर, शर्मा, सांगळे आदींशी समितीने चर्चा केली.
महाविद्यालयाचे ग्रंथालय, क्रीडा विभाग सुविधा, एनसीसी, रासेयो, उद्यान, शेतकरी समुपदेशन विभाग, महिला तक्रार निवारण विभाग, आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांशी नॅक मूल्यांकन समिती सदस्यांनी चर्चा केली. रासेयोअंतर्गत दत्तक ग्राम वरूड आणि माजी विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेले ग्राम पिंपरी (बुटी) येथे समितीने भेट दिली.
संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तर विद्यार्थिनी श्रद्धा मुंधडा हिने योगासने सादर केली. प्रसंगी समितीचे चेअरमन डॉ.सरकार यांनी समयोचित मार्गदर्शन केले. समितीने पाहणी अहवाल प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा, नॅक समन्वयक डॉ.ए.बी. लाड यांच्याकडे सादर केला. (वार्ताहर)