अट्टल घरफोड्या चिकण्या अटकेत

By Admin | Updated: September 16, 2015 03:05 IST2015-09-16T03:05:41+5:302015-09-16T03:05:41+5:30

अट्टल घरफोड्या चिकण्या ऊर्फ रोशन क्षीरसागर याला शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा ताब्यात घेतले आहे.

Insatiable burglary hanging | अट्टल घरफोड्या चिकण्या अटकेत

अट्टल घरफोड्या चिकण्या अटकेत

यवतमाळ : अट्टल घरफोड्या चिकण्या ऊर्फ रोशन क्षीरसागर याला शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच चिकण्याला नेहरूनगर, गांधीनगर, श्रीकृष्ण सोसायटी येथील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून दहा लाखांच्यावर मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. त्यानंतर चिकण्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
जामिनावर बाहेर येताच चिकण्याने पुन्हा आपला उद्योग सुरू केला. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास विठ्ठलवाडी परिसरातील विपीन कारिया यांच्या घरी हात मारला. तब्बल चार लाखांचा मुद्देमाल या घटनेत चिकण्याने लंपास केला. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम चिकण्याचा तपास सुरू केला. यावेळी चिकण्याने एका नवीन साथीदाराला सोबत घेऊन घरफोडी केली. मात्र गुन्ह्याची पद्धत यापूर्वीच्या घटनांमध्ये होती तशीच आढळून आली. यावरूनच पोलिसांना गुन्हेगार कोण हे ओळखणे सोपे झाले. शोध पथकाने चिकण्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विठ्ठलवाडी परिसरातील घरफोडीच्या प्रकरणाचा तपास शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर व त्यांचे पथक करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Insatiable burglary hanging