शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीची शिकार : पांढरकवडा येथे चौकशी समिती दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:19 IST

१३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार करणा-या टी-१ वाघिण अवनीची शिकार केल्या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी उच्च पदस्थ अधिका-यांची एक समिती मंगळवारी पांढरकवडा तालुक्यात दाखल झाली. 

यवतमाळ : १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार करणा-या टी-१ वाघिण अवनीची शिकार केल्या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी उच्च पदस्थ अधिका-यांची एक समिती मंगळवारी पांढरकवडा तालुक्यात दाखल झाली. अवनी या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याऐवजी तिला गोळी घालून ठार केल्याने देशभर वादळ उठले आहे. वन्यजीवप्रेमी तिच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाने चौकशीची तयारी दर्शविली. त्या अनुषंगाने एक उच्चपदस्थ सदस्यांची समिती मंगळवारी पांढरकवडा वनविभागात पोहोचली. या समितीने वाघिणीला पकडण्यासाठी निर्माण केलेल्या कक्ष क्र.१४९ या बेस कॅम्पला भेट दिली. तेथेच त्यांची बैठकही झाली. या समितीमध्ये वन्यजीवप्रेमी, उच्च पदस्थ वनअधिकारी, दिल्लीतील व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे अधिकारी आदींचा समावेश असल्याचे सांगितले जाते. वाघिणीची शिकार करणाºया हैदराबाद येथील नवाब व त्याच्या मुलालाही या समितीपुढे पाचारण करण्यात आले आहे. मात्र या समितीपासून नागरिक व प्रसार माध्यमांना दूर ठेवले गेले आहे.पांढरकवडा वनविभागांतर्गत वनपथकाने गोळी घालून ठार केलेल्या नरभक्षक वाघीण अवनीच्या मृत्युची चौकशी कक्ष क्र १५० लोणी येथे सुरू आहे. त्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. डॉ. एस.एच. पाटील (पीसीसीएफ, उत्पादन व व्यवस्थापन) हे या समितीचे अध्यक्ष आहेत. वन्यजीव संरक्षण ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया हे सदस्य, तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोळकर (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. चार मुद्यांवर या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपूर्वी या समितीला आपला स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर करायचा आहे. समितीकडे चौकशीसाठी केवळ ०९ दिवस आहेत.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणYavatmalयवतमाळ