वनपरिक्षेत्रात चौकशीच्या फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2015 03:45 IST2015-08-01T03:45:15+5:302015-08-01T03:45:15+5:30

येथील उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी स्वत: पारवा वनपरीक्षेत्रात धाड घालून चार लाखांचे सागवान पकडले.

Inquiries round the clock | वनपरिक्षेत्रात चौकशीच्या फेऱ्या

वनपरिक्षेत्रात चौकशीच्या फेऱ्या


पांढरकवडा : येथील उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी स्वत: पारवा वनपरीक्षेत्रात धाड घालून चार लाखांचे सागवान पकडले. यात काही कर्मचाऱ्यांना निलंबितही केले. गुरूवारी दुसऱ्या दिवशी या प्रकरणाच्या मुळात शिरण्यासाठी वन विभागाच्या पथकासह पारवा वनपरीक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना पारवा वनपरीक्षेत्र कार्यालयात बोलावून चौकशी सुरू केली. यामुळे गुरूवारी दिवसभर चौकशीच्या फेऱ्या सुरू होत्या.
पारवा वनपरिक्षेत्रात झटाळा बिटमध्ये अवैधरीत्या सागवानाची तोड करून त्याची विल्हेवाट लावत असताना खुद्द डीएफओंनीच बुधवारी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली होती. गुरूवारी दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या पथकासह पारवा वनपरिक्षेत्राचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन चौकशी केली. यासंबंधी वन विभागाच्याही कर्मचाऱ्यांची पारवा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात गुरूवारी दिवसभर चौकशी सुरू होती.
अवैध वृक्षतोड प्रकरणातील मुख्य तस्कर अद्याप मोकाटच आहे. या तस्कराचा सदर प्रकरण दडपण्याचा जोरात प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्याने आपले राजकीय वजन वापरल्याचेही सांगण्यात येते. मात्र येथील उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद कुठल्याही दबावाखाली येत नसल्याने त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहे. उपवनसंरक्षकाने सदर प्रकरण गांभीर्याने घेतल्याने या प्रकरणात मोठे मासे अडकणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Inquiries round the clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.