भूसंपादन मोबदल्यात शेतकºयांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:19 IST2017-12-14T23:19:08+5:302017-12-14T23:19:25+5:30
नागपूर-तुळजापूर राष्टÑीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र मोबदला देताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

भूसंपादन मोबदल्यात शेतकºयांवर अन्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राष्टÑीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र मोबदला देताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
या दोनही मार्गासाठी शासनातर्फे जमीन संपादित केली जात आहे. मात्र समृद्धी महामार्गाच्या तुलनेत अत्यंत तोकडो मोबदला दिला जात आहे. नागपूर-तुळजापूर महामार्गासाठी केवळ ३५ ते ५० रुपये प्रति चौरस मीटर तर रेल्वे मार्गासाठी १५ ते २५ रुपये प्रति चौरस मीटर मोबदला जाहीर झाला आहे. राज्यातील इतर ठिकाणी मात्र प्रति चौरस फुटाप्रमाणे मोबदला जाहीर झाला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघर्ष समिती, कळंब तालुका विकास आघाडी, रेल्वे व महामार्ग बाधित शेतकरी समितीच्या नेतृत्वात येथील तिरंगा चौकात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी भूसंपादनाचा चौरस मीटर प्रमाणे ५५० ते ७०० रुपये दर द्यावा, विहीर बाधित झाल्यास सर्वच फळझाडांचा मोबदला द्यावा, जाहीर झालेल्या निवाड्याचे पुनर्विलोकन करावे, निवाड्यातील चुकांची दुरुस्ती करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.