शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

महागाईचा भडका; ग्रामीणमध्ये पुन्हा पेटल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

घरोघरी गॅस पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने उज्ज्वला योजना राबविली. याअंतर्गत १०० रुपयांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना गॅस कनेक्शन जोडणी देण्यात आली. त्यानंतर ही जोडणी मोफत करण्यात आली. मात्र, गॅस कनेक्शन मिळाले तरी सिलिंडर मात्र विकत घ्यावे लागते आणि याच सिलिंडरच्या किमती भरमसाठ वाढल्याने उज्ज्वला योजनेचा बोजवारा उडाला असून, योजनेबाहेरील कुटुंबालाही १०३३ रुपयांचे सिलिंडर घेणे परवडेनासे झाले आहे.

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरगुती सिलिंडरच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहाने गॅस सिलिंडर घरी आणलेली शेकडो कुटुंबे आता स्वयंपाकासाठी चुलीकडे वळली आहेत. ‘लोकमत’ने यवतमाळ तालुक्यातील वाघाडी आणि जांबमध्ये याबाबत आढावा घेतला असता गावातील सुमारे ८० टक्के घरात गॅस सिलिंडर आहे. मात्र, मागील काही महिन्यांत ४० टक्के कुटुंबांनी सिलिंडरचा वापर थांबविल्याचे विदारक चित्र पुढे आले. घरोघरी गॅस पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने उज्ज्वला योजना राबविली. याअंतर्गत १०० रुपयांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना गॅस कनेक्शन जोडणी देण्यात आली. त्यानंतर ही जोडणी मोफत करण्यात आली. मात्र, गॅस कनेक्शन मिळाले तरी सिलिंडर मात्र विकत घ्यावे लागते आणि याच सिलिंडरच्या किमती भरमसाठ वाढल्याने उज्ज्वला योजनेचा बोजवारा उडाला असून, योजनेबाहेरील कुटुंबालाही १०३३ रुपयांचे सिलिंडर घेणे परवडेनासे झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात सहा लाखांवर कुटुंबे गॅस सिलिंडरचा वापर करतात.  या कुटुंबाचा केरोसीन पुरवठा बंद करण्यात आला. आता सिलिंडर परवडत नाही आणि केरोसीन मिळत नाही, अशी स्थिती झाल्याने अनेक ग्रामस्थ सरपणाकडे वळले आहेत. वाघाडी आणि जांबमध्ये गॅस सिलिंडरचा वापर थांबविलेल्या कुटुंबाशी संवाद साधला असता हजार रुपयांचे सिलिंडर घेणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे चुलीकडे वळल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात ४० हजार सिलिंडरची झाली कपात - जिल्ह्यात सहा लाखांवर गॅस कनेक्शन असून, त्यात २ लाख ८५ हजार कुटुंबांकडे उज्ज्वला योजनेतून मिळालेल्या गॅस सिलिंडरचा वापर होतो. मात्र मागील काही महिन्यांत महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे. त्यातच सिलिंडरच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ४० हजार कुटुंबांनी गॅस सिलिंडरचा वापर थांबविला असल्याचे पुढे आले आहे. सिलिंडरची किमत १०३३ आहे. शिवाय ग्रामीण भागात घरापर्यंत सिलिंडर आणण्यासाठी इतर रक्कम मोजावी लागत असल्याने अनेकांनी आपला मोर्चा सरपणाकडे वळविला आहे.

होय मागणी घटली 

गॅस एजन्सीमार्फत यवतमाळ तालुक्यातील शंभर गावामध्ये महिन्याला आठ हजार सिलिंडर पाठविले जात होते. सिलिंडरच्या किमती वाढत गेल्याने आता दर महिन्याला पाच ते साडेपाच हजार सिलिंडरचीच मागणी आहे. ग्रामीण भागातील अनेकांनी वाढत्या महागाईमुळे सिलिंडरचा वापर थांबविला आहे. इतर एजन्सीच्या कार्यक्षेत्रातही सिलिंडर मागणीत घट दिसते. - मिलिंद धुर्वेगॅस एजन्सी चालक, यवतमाळ.

गोरगरिबांचा विचार करा सिलिंडरचे दर वाढले आहेत. आमच्या घरात मजुरी करणारा एकच सदस्य आहे. एवढा मोठा खटला कसा चालवायचा, हाच प्रश्न आहे. घरी सिलिंडर आहे, पण स्वयंपाक करण्यासाठी ते वापरता येत नाही. असलेले सिलिंडर संपल्याने ते भरण्यासाठी पैसेच नाहीत. सरकारने गोरगरीब जनतेचा विचार करावा. - वच्छला उमाटे, जांब 

पाहुणे आले तरच सिलिंडरचा वापर आमचे मोठे कुटुंब आहे. एका सिलिंडरवर महिनाभराचा स्वयंपाकही होत नाही. केवळ पाहुणे आले तरच आम्ही त्याचा वापर करतो. नाही तर शेतातून आणलेल्या फणावर स्वयंपाक केला जातो. तुऱ्हाटी, पऱ्हाट्या उन्हाळ्यात जमा केल्या आहे. त्याच्यावर आता गुजराण सुरू आहे. - दुर्गा ठाकरे, वाघाडी 

जळतणावरच  करतो स्वयंपाक सिलिंडर पुरला पाहिजे म्हणून चुलीवर स्वयंपाक करतो. बजेट लागल्यानंतरच सिलिंडर आणण्याचा विचार येतो. जंगलातून जळतण आणून त्याच्यावरच स्वयंपाक करते. आमच्यासारख्या गरिबांना सिलिंडर कुठे परवडतो. १ हजार रुपयांच्या वर सिलिंडर गेले आहे. इतक्या पैशात किराणा होतो.            - अन्नपूर्णा मडावी, जांब

सबसिडीही  गायब झाली आमच्या गावात सिलिंडर गॅसची संख्या मोठी आहे. मात्र, आता केवळ २० टक्के लोकच नियमितपणे सिलिंडर भरून आणत आहेत. सिलिंडरच्या दरवाढीने प्रत्येकाला गॅसवर स्वयंपाक करणे शक्य होत नाही. सबसिडी देखील कमी झाली आहे. पूर्वी कमी पैशात सिलिंडर मिळत होते. तसेच दर असावेत. - सोनाली टिचुकले, सरपंच जांब

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर