शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

जिल्ह्यात साथीच्या तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

महिनाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने आता डासांचाही उपद्रव वाढत आहे. शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या रक्त नमुने तपासणीत जानेवारीपासून आतापर्यंत १७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरियाचेही १० रूग्ण आढळले आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देडेंग्यू, मलेरिया नियंत्रणात । शासकीय रुग्णालयात वाढतेय गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सततच्या ढगाळी वातावरणामुळे साथीच्या तापाची लागण होत आहे. प्रत्येक घरात तापाचे रुग्ण आढळत आहे. सुदैवाने यावर्षी डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, डायरिया सारख्या घातक आजारांचा आतापर्यंत उद्रेक झाला नाही. मात्र सर्दी, खोकला, ताप याचे रुग्ण दिवसेन्दिवस वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय औषधशास्त्र विभागात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या ही ७०० च्या घरात पोहोचली आहे. यापैकी ५० रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागत आहे.साधारणत: जुलै महिन्यानंतर आजाराचे प्रमाण वाढण्यास सुरूवात होते. यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातही पाऊस मोजकाच पडला. त्यामुळे डबके साचून, पुराचे पाणी शिरून जलस्त्रोत दूषित झाले नाही. परिणामी साथीच्या आजाराचा कुठे उद्रेक झाला नाही. ही बाब जिल्हावासीयांसाठी सुखद असली, तरी आता साथीच्या तापाने डोके वर काढले आहे. या तापाचा झपाट्याने फैलाव होत आहे. महिनाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने आता डासांचाही उपद्रव वाढत आहे. शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या रक्त नमुने तपासणीत जानेवारीपासून आतापर्यंत १७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरियाचेही १० रूग्ण आढळले आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याची गरज आहे.६८ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधाविविध तालुक्यात फवारणीतून विषबाधा होणाºया शेतकºयांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ६८ शेतकºयांना विषबाधा झाली आहे. यापैकी ४४ शेतकºयांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर चार शेतकरी अर्धवट उपचार सोडून रुग्णालयातून पळून गेले. अजूनही २० शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. ढगाळ वातारवणामुळे सोयाबीन व कापूस पिकावर अळ्याचा मोठा प्रार्दुभाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकºयांना फवारणी करण्याशिवाय पर्याय नाही. यातूनच विषबाधा होण्याच्या घटना घडत आहे. कृषी यंत्रणा जनजागृती करत असली तरी विषबाधीत शेतकरी-शेतमजुरांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.व्हायरल फिव्हर म्हणजे साथीचा ताप. या तापाचे रुग्ण काही आठवड्यापासून वाढले आहे. सर्दी, खोकला व घश्यात संसर्गाचे रुग्ण येत आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावा व योग्य खबरदारी बाळगावी. - डॉ. बाबा येलके,विभाग प्रमुख, औषधीशास्त्र विभाग

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू