कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावात वणीकरांना महागाईचाही डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:27+5:30

धान्याचा मागणी केल्यानंतरही पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भावात आम्हाला धान्याचा पुरवठा होत आहे, त्यात थोडी मार्जीन ठेवून धान्य विक्री करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी केल्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने धान्याची वाहने वणीत येत असल्याचेही एका दुकानदाराने सांगितले. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंची चढ्या भावात विक्री करू नका, असे शासनातर्फे बजावण्यात आले असले, तरी किराणा व्यावसायिक मात्रं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गंभीर बाब ही की, या व्यावसायिकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरू आहे.

Infectious bouts of infectious disease spread in the outbreak of corona virus | कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावात वणीकरांना महागाईचाही डंख

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावात वणीकरांना महागाईचाही डंख

ठळक मुद्देचढ्या भावाने धान्य विक्री। धान्याची आवक होत नसल्याची व्यापाऱ्यांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वेगाने होत असताना लॉकडाऊनचा फायदा उचलत येथील धान्य व्यापारी चढ्या भावाने धान्याची विक्री करीत आहे. त्यातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे.
यासंदर्भात काही व्यापाऱ्यांना विचारणा केली असता, धान्याचा मागणी केल्यानंतरही पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भावात आम्हाला धान्याचा पुरवठा होत आहे, त्यात थोडी मार्जीन ठेवून धान्य विक्री करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी केल्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने धान्याची वाहने वणीत येत असल्याचेही एका दुकानदाराने सांगितले. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंची चढ्या भावात विक्री करू नका, असे शासनातर्फे बजावण्यात आले असले, तरी किराणा व्यावसायिक मात्रं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गंभीर बाब ही की, या व्यावसायिकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरू आहे. लॉकडाऊनमधून केवळ किराणा दुकान, मेडिकल यांसह जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाºया प्रतिष्ठानांना सूट देण्यात आली आहे. कोरोनामुळे पुढे परिस्थिती काय राहील, याचे कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही. परिस्थिती चिघळली तर धान्याची दुकानेही बंद होतील, अशा भितीपोटीही काही लोक आपल्या घरात धान्याचा साठा करून ठेवत आहेत. याचाच फायदा किराणा व्यावसायिक उचलत असल्याचे चित्र वणी शहरात पहायला मिळत आहे.
लॉकडाऊन पूर्वी सोयाबीन तेलाची १५ लिटरची कॅन १२५० रुपयांना मिळत होती. त्याचे भाव आता १४०० रुपयांवर पोहचले आहेत. तूर डाळ ८० रुपये किलोवरून ९५ रुपये प्रतिकिलो झाली आहे. दोन हजार ३०० रुपये क्विंटलाचा गहू दोन हजार ६०० ते दोन हजार ७०० रुपयांपर्यंत पोहचला आहे. पाच किलो आट्याची पिशवी १४० रुपयांवरून १६० रुपयांवर पोहचली आहे. अन्य डाळींचे भावदेखील ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत.

भाजीपल्याचे भाव वधारले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजीपाल्याचेही भाव चांगलेच वाढले आहेत. २० रुपये किलो मिळणारा आलू आता ४० रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. अन्य भाज्यांच्या किंमतीही पाच ते १० रुपयांनी वाढविण्यात आल्याने गृहीणींचे बजेट बिघडले आहे.

Web Title: Infectious bouts of infectious disease spread in the outbreak of corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.