डेंग्यूसदृश आजाराने जवळगाव येथे बालिकेचा मृत्यू

By Admin | Updated: May 30, 2014 00:25 IST2014-05-30T00:25:05+5:302014-05-30T00:25:05+5:30

तालुक्यातील जवळगाव येथे डेंग्यूसदृश आजाराचा कहर कायमच असून गुरुवारी नागपूर येथे उपचार घेत असलेल्या एका सात वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र आरोग्य

Infantile Disease | डेंग्यूसदृश आजाराने जवळगाव येथे बालिकेचा मृत्यू

डेंग्यूसदृश आजाराने जवळगाव येथे बालिकेचा मृत्यू

किशोर वंजारी - नेर
तालुक्यातील जवळगाव येथे डेंग्यूसदृश आजाराचा कहर कायमच असून गुरुवारी नागपूर येथे उपचार घेत असलेल्या एका सात वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र आरोग्य यंत्रणा अद्यापही निद्रिस्त असल्याचे दिसून येते.
जवळगाव येथे गेल्या दीड महिन्यांपासून डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत ४२ जणांना लागण झाली आहे. यातील तीन बालके नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यापैकी राधा सुधीर गुघाने (७) या बालिकेचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तन्मय सुजित कुंभारे, खुशी मानकर या दोन बालकांवर नागपूर येथे उपचार सुरू आहे. तसेच प्रथमेश गावंडे, वेदिका निंबर्ते, सिद्धार्थ दाढे, यश गावंडे, आदित्य गुघाने, कृष्णा गावंडे, सृष्टी निंबर्ते, गार्गी गुघाने, सर्मथ गुघाने यांच्यासह ४२ जण डेंग्यूसदृश आजाराने बाधित आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने गुरुवारी जवळगाव येथे भेट दिली. त्यावेळी गावात दहशीतीचे वातावरण दिसून आले. बालिकेच्या मृत्यूने गावावर शोककळा होती. तर डेंग्यूसदृश आजाराच्या भीतीने लहान मुलांना बाहेरगावी हलविल्याचे दिसून आले. गावातील पाण्यात नियमित ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नसल्याचे पुढे आले. डेंग्यूसदृश आजाराचा प्रकोप गावात सुरू असताना पाणी स्वच्छतेबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. गावात गटाराचे पाणी रस्त्यावर वाहताना दिसून आले. आरोग्य विभागाच्यावतीने गावात फवारणी करण्यात आली असली तरी त्याचाही उपयोग दिसत नाही. विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्यावतीने ठोस उपाययोजना करताना दिसून आले नाही. केवळ जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने गावाला भेट देऊन पाहणी केली. सदर गाव बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून गावापासून ते २५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गैरसोय होते. आरोग्य यंत्रणाही गावापर्यंत पोहोचण्यास असर्मथ असते. त्यामुळे सर्वांचेच दुर्लक्ष होते.
 

Web Title: Infantile Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.