कुख्यात किशोर पंडितचा खून खंडणीच्या वादातूनच
By Admin | Updated: October 21, 2014 22:58 IST2014-10-21T22:58:57+5:302014-10-21T22:58:57+5:30
वाघनखाचे लॉकेट हिसकावल्याचे तत्कालिक कारण असले तरी खंडणीच्या वादातूनच कुख्यात किशोर पंडितचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली. तिन्ही मारेकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील धानोरा

कुख्यात किशोर पंडितचा खून खंडणीच्या वादातूनच
यवतमाळ : वाघनखाचे लॉकेट हिसकावल्याचे तत्कालिक कारण असले तरी खंडणीच्या वादातूनच कुख्यात किशोर पंडितचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली. तिन्ही मारेकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील धानोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकापुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर चौकशीत त्यांनी ही कबुली दिली.
बसस्थानक चौकाच्या आॅटो पॉर्इंट परिसरात किशोर पंडित रा.तुळजानगरी याचा धारदार चाकू आणि घातक शस्त्राने वार करून खून करण्यात आला. घटनेनंतर पसार झालेले मारेकरी सचिन आगलावे रा.विदर्भ हाऊसिंग सोसायटी, नितीन धुमाळ रा.महानंदनगर, अमोल बोबडे रा.यवतमाळ यांनी सोमवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील धानोरा येथे पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी अटक करून त्यांची चौकशी केली. त्यामध्ये तिघांनीही खुनाची कबुली दिली. तसेच फिशफ्रायच्या दुकानात तो नेहमीच खंडणी मागायचा हे या खुनाचे मुख्य कारण असल्याचेही मारेकऱ्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)