‘जेडीआयईटी’मध्ये औद्योगिक स्वयंचलित कार्यप्रणाली कार्यशाळा
By Admin | Updated: February 16, 2017 00:18 IST2017-02-16T00:18:28+5:302017-02-16T00:18:28+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात बेसिक इंडस्ट्रीयल आॅटोमेशन या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

‘जेडीआयईटी’मध्ये औद्योगिक स्वयंचलित कार्यप्रणाली कार्यशाळा
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात बेसिक इंडस्ट्रीयल आॅटोमेशन या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात द्वितीय व तृतीय वर्ष परमाणु आणि दूरसंचार तसेच विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
परमाणु व दूरसंचार विभागातील आयईटीई स्टुडंट फोरम, ईटा क्लब आणि नागपूर येथील प्रोलिफिक सिस्टीम्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटनप्रसंगी संयोजक तथा विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने, कार्यशाळा तज्ज्ञ समीर चौरे, अमोल आगरकर, पराग टेंभुर्णे, प्रा. पंकज पंडित, समन्वयक प्रा. अतुल शिंगाडे आदी उपस्थित होते.
डॉ. संजय गुल्हाने यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगताना औद्योगिक क्षेत्रात आलेल्या स्वयंचलित कार्यप्रणालीच्या अनेक संधींबाबत मार्गदर्शन केले. संचालन प्रा. सादिक फानन यांनी केले.
कार्यशाळेदरम्यान पीएलसी प्रोग्रामिंग, स्काडा प्रोग्रामिंग व त्यावरील प्रात्यक्षिकांवर प्रशिक्षण देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात इंडस्ट्रीयल आॅटोमेशन लॅबमधील प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. या कार्यशाळेचा भविष्यातील कारकीर्दीत निश्चितच लाभ होईल, असे मत विद्यार्थ्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. (वार्ताहर)