गृह सचिवांनी दिले कारवाईचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:26 IST2017-10-09T00:26:12+5:302017-10-09T00:26:48+5:30

किटकनाशक फवारताना विषबाधा होणे ही बाब चिंताजनक आहे. हा विषय शासनाने गांभीर्याने घेतला आहे. सर्वांशी चर्चा करून या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

 Indicative action taken by the Home Secretary | गृह सचिवांनी दिले कारवाईचे संकेत

गृह सचिवांनी दिले कारवाईचे संकेत

ठळक मुद्देबाधितग्रस्तांशी चर्चा : सावरगावच्या फुलमाळी कुटुंबाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : किटकनाशक फवारताना विषबाधा होणे ही बाब चिंताजनक आहे. हा विषय शासनाने गांभीर्याने घेतला आहे. सर्वांशी चर्चा करून या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतरच कारवाईची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) सुधीरकुमार श्रीवास्तव यांनी दिली.
विषबाधीत शेतकºयांशी त्यांनी कळंब येथील विश्राम भवनात चर्चा केली. ईश्वर पिसे, मारोती वसू, मनोहर काळे, श्रीकांत लिखार, देवानंद मोहुर्ले, चरणदास पिसे यांना फवारणी करताना विषबाधा झाली होती. शेतकºयांनी कोणती औषधी फवारली, त्याचे प्रमाण काय होते, कोणती औषधी फवारली पाहिजे यासंबधी कोणी माहिती दिली. त्रास कधी आणि कशाप्रकारचा व्हायला लागला. वेळेत उपचार मिळाले की नाही. कृषी विभागाची असलेली भूमिका याविषयी त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.
सुधीरकुमार श्रीवास्तव यांनी उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे यांना विषबाधेची कारणे विचारली. त्यांनी दिलेल्या उत्तरावर शेतकरी मात्र सहमत नव्हता. यावेळी आमदार डॉ.अशोक उईके यांनी फवारणीमुळे शेतकºयांना होणाºया त्रास व नुकसानीविषयी अवगत केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, आनंदराव जगताप, चंद्रशेखर चांदोरे यांच्यासह उपस्थित शेतकरी, शेतमजुर यांचीही मते जाणून घेतली.
त्यानंतर संपूर्ण ताफा सावरगावकडे रवाना झाला. तेथे गजानन फुलमाळी यांच्या कुंटुंबाची त्यांनी विचारपूस केली. शासनाकडून मिळणारी मदत आणि इतर आवश्यक सहकार्य तातडीने देण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले. सावरगाव येथे शेतकरी व शेतमजुरांशी चर्चा करुन त्यांचे मत नोंदवून घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सीईओ डॉ. दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक एम. राज कुमार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, एसडीओ संदीपकुमार अपार, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, तहसीलदार रणजित भोसले, कृषी अधिकारी पाठक, किशोर अंबरकर आदी उपस्थित होते.

Web Title:  Indicative action taken by the Home Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.