कळंब येथे भारतीय बौद्ध महासभेची रॅली

By Admin | Updated: March 5, 2016 02:40 IST2016-03-05T02:40:54+5:302016-03-05T02:40:54+5:30

भारतीय बौद्ध महासभा, भारिप-बहुजन महासंघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्यावतीने येथे रॅली काढण्यात आली.

Indian Buddhist Mahasabha rally at Kalambal | कळंब येथे भारतीय बौद्ध महासभेची रॅली

कळंब येथे भारतीय बौद्ध महासभेची रॅली

कळंब : भारतीय बौद्ध महासभा, भारिप-बहुजन महासंघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्यावतीने येथे रॅली काढण्यात आली. तथागत नगर, माथा वस्ती, नालंदा बौद्ध विहार परिसर, रासा रोड, दत्त रोड कॉलनी आदी भागातील नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
समारोपीय कार्यक्रम माथा वस्तीतील तक्षशीला बौद्ध विहारात झाला. अध्यक्षस्थानी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष मधुकरराव खैरकार होते. ‘बार्टी’चे समतादूत रुपेश वानखडे, हंसराज झपाटे, सुगत नारायणे, प्रमिलाताई भगत, श्रीकांत भुजाडे, मुकिंदराव थोरात आदींनी यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
नगरसेवक मारोती दिवे, अनिल तामगाडगे, रमेश ओंकार, विजय थोरात, नारायण बुरबुरे, सुधाकर खैरकार, धम्मा थोरात, नितेश थोरात, उद्धवराव इंगोले, दशरथ जवादे, चंदन कांबळे, भीमराव काळे, मोरेश्वर ठोंबरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक स्वाती वाघमारे, संचालन उज्ज्वला भवरे, आभार जयकुमार भवरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनंदा बेसेकर, सरला बुरबुरे, अनिता थोरात, संगीता थोरात, ज्योती थोरात, शशिकला धवने, कांचन तामगाडगे, कमलाबाई थुल, मायाताई ओंकार, विद्या ठोंबरे, सोनू टेंभरे, पुष्पलता अंभोरे, साधना खैरकार, शोभा खैरकार, साधना वानखडे, प्रमिला अलोणे, राजेंद्र बलवीर, प्रफुल्ल वानखडे, प्रशिक भवरे, विशाल मुजमुले आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Indian Buddhist Mahasabha rally at Kalambal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.