भारतीय बौद्ध महासभेचा घाटंजीत आनंदोत्सव

By Admin | Updated: July 9, 2016 02:39 IST2016-07-09T02:39:30+5:302016-07-09T02:39:30+5:30

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला.

Indian Buddhist General Assembly Ghatanjit Ganyantasav | भारतीय बौद्ध महासभेचा घाटंजीत आनंदोत्सव

भारतीय बौद्ध महासभेचा घाटंजीत आनंदोत्सव

जल्लोष : रामदास आठवले मंत्रिमंडळात
घाटंजी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. याबद्दल येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए), भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखेतर्फे पेढे वाटून, फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवने, तालुका सरचिटणीस अशोक राठोड, गिरीधर राठोड, मधुकर निस्ताने यांनी मार्गदर्शन केले.
खासदार रामदास आठवले यांच्या सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी झालेल्या निवडीमुळे समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहे, असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी सुखदेवराव रामटेके, बाबाराव फुटाणे, संतोष जीवने, आनंदराव कांबळे, सतीश रामटेके, गजानन देवतळे, हरिदास भगत, प्रकाश लढे, ताराचंद मुराद, सूर्यकांत ढोके, प्रवीण कांबळे, अशोक निमसरकार, मोतीराम बन्सोड, राजू नारायणे, अमृत करमनकर, ज्योतिबा कानिंदे, हरिदास तेलंग, राजू कुंभारे, फकिरा तायडे, सुधाकर अक्कलवार, शेषराव नगराळे, रंजन देठे, विजय दुधे, रूपेश कलाने, विजय वाघमारे, गिरीधर सोनडवले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Indian Buddhist General Assembly Ghatanjit Ganyantasav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.