शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या वाढत्या संख्येने वन्यप्रेमींत आनंद; पण शेतकरी दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्य । उणिवा दूर करण्यासह अडचणींचा पाठपुरावा करणे आवश्यक

प्रविण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील टिपेश्वर अभ्यारण्यासह परिसरातील जंगलात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यामुळे वन्यप्रेमी आनंद व्यक्त करीत असले तरी शेतकऱ्यांत मात्र दिवसेंदिवस भय वाढत चालले आहे.अभयारण्यासह परिसरातील जंगलात वाघांसाठी योग्य व्यवस्थापन नसल्याने हे वाघ परिसरातील शेतात, कधी गावात शिरून जनावरांवर तर कधी मजुरांवर हल्ले करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली.शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशावेळी वन्यजीव विभागाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवून सहकार्याने व्यवस्थापन केल्यास पुढील काळात चित्र काही वेगळे होऊ शकते, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. वाघांच्या संख्येत वाढ होणे, ही अतिशय सकारात्मक आणि पर्यटन वाढीला चालना देणारी बाब आहे. यामुळे पर्यटन आणि रोजगार वाढू शकतो. राखीव नसणाºया जंगलातही वाघाचे वास्तव्य आहे. मात्र या क्षेत्रात वाघाचे संरक्षण गंभीरपणे होत नसल्याचे दिसून येते. या संरक्षणासाठी वनाधिकाºयांना अतिरिक्त मनुष्यबळ अभयारण्यात व या क्षेत्रात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.जंगलातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. जंगलात पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध राहिले, तर गवत आणि इतर पाला हिरवा राहील. त्यामुळे गवतावर अवलंबून असलेले प्राणी जंगलातून इतरत्र जाणार नाही. बहुतेकवेळी यावर अवलंबून असलेले प्राणी जंगलाच्या बाहेर पडतात. त्यांना खाणारे वाघदेखील या प्राण्यांमागे जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचे योग्य प्रकारे संवर्धन होणे गरजेचे असताना या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.आंतरराज्यीय शिकाऱ्यांचा अभयारण्यावर डोळाएकीकडे वाघांची संख्या वाढत असताना आंतरराज्यीय शिकारी टोळ्यांच्या नजराही अभरण्यासह असंरक्षित परिसरात असलेल्या वाघावर वळत असल्याचे सांगितले जाते. या शिकाऱ्यांचाही बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेपूर मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी