Increased risk of 'scrub typhus' in the weeds | वणीत ‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला
वणीत ‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला

ठळक मुद्देदोन रूग्ण आढळले : एकावर सेवाग्रामच्या रूग्णालयात उपचार सुरू, एकाची प्रकृती ठणठणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : अतिशय गंभीर स्वरूपाच्या असलेल्या स्क्रब टायफस या आजाराने वणीत शिरकाव केला आहे. शहरात दोन रूग्ण आढळल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे.
यातील एका रूग्णावर चंद्रपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती ठणठणीत झाली. त्यानंतर त्याला सुटी देण्यात आली. मागील आठवड्यात पुन्हा एक रूग्ण आढळून आला असून त्याच्यावर सेवाग्रामच्या रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली. दोन वर्षांपूर्वी वणीतील एका महिलेचा स्क्रब टायफसने नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. या आजारावर वेळीच उपचार झाल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो. गवतात आढळणाऱ्या स्क्रबच्या डंखामुळे रूग्णांची प्रकृती हळूहळू खालावते. सुरूवातीला फार लक्षणे आढळत नाही. मात्र उपचार न केल्यास शरिरातील एकेक अवयव निकामी होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या किटकाचे वास्तव्य गवतात असते. त्यामुळे गवतात जास्त फिरू नये. शेतात काम करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी. दररोज सायंकाळी शेतातून आल्यानंतर आंघोळ करावी.
- डॉ.विकास कांबळे,
तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी


Web Title: Increased risk of 'scrub typhus' in the weeds
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.