‘सर्वसेवा’तील तिघांच्या कोठडीत वाढ

By Admin | Updated: May 13, 2015 02:11 IST2015-05-13T02:11:28+5:302015-05-13T02:11:28+5:30

अपहार प्रकरणात सर्वसेवा व्यापारी संकूल सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांच्या पोलीस कोठडीत आणखी १६ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Increase in the custody of three in 'service' | ‘सर्वसेवा’तील तिघांच्या कोठडीत वाढ

‘सर्वसेवा’तील तिघांच्या कोठडीत वाढ

यवतमाळ : अपहार प्रकरणात सर्वसेवा व्यापारी संकूल सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांच्या पोलीस कोठडीत आणखी १६ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डब्ल्यू. ठाकरे यांनी ही कोठडी सुनावली. महाराष्ट्र लघु गुंतवणूक सुरक्षा कायद्यानुसार सर्वसेवाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
सर्वसेवाचे अध्यक्ष पुरूषोत्तम काकडे, सचिव अशोक पेटेवार, माजी अध्यक्ष शमशुद्दीन काझी यांना फसवणूक प्रकरणात वडगाव रोड पोलिसांनी ७ मे रोजी अटक केली. न्यायालयाने या तीनही आरोपींना १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुणावली होती. त्याची मुदत संपल्याने या मंगळवारी दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वसेवात फसवणूक झालेल्या तक्रारकर्त्यांची संख्या वाढत आहे. सुरूवातीला ९३ लाख ८८ हजार ५६० रुपयांची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आत तक्रारकर्त्यांची संख्या १३ झाली असून अपहाराची रक्कम ही दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची अतिरिक्त सत्र न्यायालायात सुनावणी केली जात आहे. सर्वसेवा पतसंस्थेच्या कार्यालयाला पोलिसांनी सोमवारी सील केले. येथील संचालक मंडळाचा कार्यकाळ, त्यांच्या नावाने असलेली मालमत्ता, अध्यक्षासह संचालकाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पोलीस तपासणार आहे. शिवाय पतसंस्थेच्या मालमत्ता, पतसंस्थेने इतर ठिकाणी केलेले व्यवहार याचा सविस्तर तपास करण्यासाठी न्यायालयाकडे पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागितली आहे. या अपहार प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Increase in the custody of three in 'service'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.