‘टीडीएस’वर आयकर विभागाची कार्यशाळा

By Admin | Updated: December 9, 2015 03:01 IST2015-12-09T03:01:24+5:302015-12-09T03:01:24+5:30

आयकर विभाग नागपूर, यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज व टॅक्स प्रॅक्टीशनर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बचत भवनात टीडीएस विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

Income Tax Department Workshop on 'TDS' | ‘टीडीएस’वर आयकर विभागाची कार्यशाळा

‘टीडीएस’वर आयकर विभागाची कार्यशाळा

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : शहरातील व्यापाऱ्यांनी आयुक्तांपुढे मांडल्या समस्या
यवतमाळ : आयकर विभाग नागपूर, यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज व टॅक्स प्रॅक्टीशनर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बचत भवनात टीडीएस विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन आयकर आयुक्त राजीव रानडे यांनी केले. सर्वांना टीडीएस भरण्याचे व त्याचे विवरण वेळेवर दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, आयकर आयुक्त राजीव रानडे, सहआयुक्त रवीकुमार, उपायुक्त मुदलियार, यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशनचे अध्यक्ष श्याम भट्टड, अरुण मोडक, राजेंद्र बोबडे, आयकर अधिकारी राहुल दीडपाये, कोषागार अधिकारी ज्योती भोंडे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत आयकर सहआयुक्त रवीकुमार यांनीही मार्गदर्शन केले. आयकर उपायुक्त मुदलियार यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे टीडीएसची प्रक्रिया समजावून सांगितली. यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू यांनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या यावेळी आयकर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आयुक्त रानडे यांनी दिली. या कार्यशाळेला यवतमाळ शहरातील सर्व गणमान्य वकील, सीए, व्यापारी तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये टीडीएस विषयाची सोप्या पद्धतीने नागरिकांना माहिती देण्यात आली. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेकरिता आयकर अधिकारी राजेंद्र बोबडे, मधूसुदन मुंधडा, अशोक मिसाळ आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Income Tax Department Workshop on 'TDS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.