लाकडाच्या रकमेसाठी शेतकºयाची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:14 IST2018-02-02T22:13:39+5:302018-02-02T22:14:02+5:30
हॅमरसाठी चार महिने अडवल्यानंतर आता रकमेसाठी शेतकऱ्याला हेलपाटे दिले जात आहे. वनविभागातील या कारभाराने हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

लाकडाच्या रकमेसाठी शेतकºयाची अडवणूक
चरण राठोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी(रोड) : हॅमरसाठी चार महिने अडवल्यानंतर आता रकमेसाठी शेतकऱ्याला हेलपाटे दिले जात आहे. वनविभागातील या कारभाराने हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. नागपूर प्रादेशिक प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदन पाठवून या शेतकºयाने आपली कैफियत मांडली आहे.
मारेगाव तालुक्याच्या जानकाई पोड येथील नीळकंठ अय्या टेकाम यांच्या मेढणी येथील आदिवासी मालकी गट क्र.८६ मधील सागवान मारेगाव वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या आदेशाने ९ आॅगस्ट २०१७ रोजी तोडण्यात आले. मात्र चार महिन्यांपर्यंत हॅमर करण्यात आले नाही. उपवनसंरक्षकांची वारंवार भेट घेतल्यानंतर १८ डिसेंबर रोजी हॅमर करण्याचा आदेश दिला. हॅमर होऊन पास आॅर्डरनुसार उमरी येथील वखारीत सागवान टाकण्यात आले. त्याचवेळी ५० टक्के रक्कम मिळायला पाहिजे होती. परंतु वखार अधिकाºयांकडून यासाठी टाळाटाळ सुरू आहे. ८ जानेवारी रोजी उपवनसंरक्षकांकडे अर्ज आणि उमरी वखारीचा अहवाल सादर करण्यात आला. यानंतरही ही रक्कम देण्यात आली नाही. आदिवासी मालकी प्रकरणात ५० टक्के रक्कम देण्याविषयी जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप नीळकंठ टेकाम यांनी केला आहे. ५० टक्के रक्कम न मिळाल्यास उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. दहा लाख २१ रुपयांचे सागवान वखारीत टाकण्यात आले. त्यातील अर्धी रक्कम मिळावी, यासाठी टेकाम यांनी अर्ज केला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.