शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पोलीस ॲक्शन मोडमध्ये; जातीय दंगली घडविणाऱ्यांच्या कुंडलीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय केले पाहिजे याचा कार्यक्रमच आखून दिला आहे. जातीय दंगली मध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी कलम १५१ (३), १४४ (२) याचाही आधार घेण्यात आला आहे. काहींना १४९ नुसार नाेटीस बजावण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था बाधित होईल, असे कृत्य करू नये याबाबत सूचित करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात भोंग्यावरुन जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर इशारा दिला. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस दल कामाला लागले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जातीय दंगली घडविणाऱ्यांची कुंडली  गोळा केली जात आहे. यासाठी पाच वर्षातील गुन्ह्यांचा निकष ठेवण्यात आला आहे. वारंवार जातीय गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सलग दोन दिवस ध्वनीप्रदूषण, पर्यावरण अधिनियम याशिवाय त्या अनुषंगाने निघालेली शासनाची विविध परिपत्रके याचा अभ्यास केला. त्यावरून एक एसओपी तयार करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीसुद्धा पुसद येथील बैठकीत याबाबत निर्देश दिले. त्यावरून सोमवारी सर्व ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये दीर्घ चर्चा झाली. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय केले पाहिजे याचा कार्यक्रमच आखून दिला आहे. जातीय दंगली मध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी कलम १५१ (३), १४४ (२) याचाही आधार घेण्यात आला आहे. काहींना १४९ नुसार नाेटीस बजावण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था बाधित होईल, असे कृत्य करू नये याबाबत सूचित करण्यात आले आहे. 

   मनसे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत? - वणी येथील मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना मंगळवारी रात्री नोटीस बजावण्याची प्रक्रिया करण्यात येत होती. त्याच वेळी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.

वणी पोलिसांची राजू उंबरकर यांना नोटीसn मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपासून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी परिसरात काही प्रमाणात मनसेची ताकद आहे. त्यामुळे वणी पोलीस सतर्क झाले आहेत. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह दहा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सीआरपीसी १९७३ चे कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. सध्या भोंगा (स्पीकर) यावरून राजकीय वातावरण तापलेले आहेत. आपणाकडून या संबंधाने विरोध म्हणून विनापरवाना भोंगा लावून नियमांचे उल्लंघन केल्यास आपणाविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल व सदरील नोटीस ही न्यायालयात आपल्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात येईल, असे या नोटिसीत स्पष्ट केले आहे. 

अपर अधीक्षकांच्या नियंत्रणात सनियंत्रण समिती- भोंग्याबाबत जिल्ह्यात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे या समितीचे प्रमुख आहे. याशिवाय गृहउपअधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी यांचाही समावेश या समितीमध्ये आहे. उपविभागीय अधिकारी या समितीचे नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे. त्यांच्या मार्फतच पोलीस ठाणे स्तरावरून कारवाई केली जाणार आहे. शिवाय नागरिकांनाही तक्रारी करण्यासंदर्भात या समितीची माहिती दिली जाणार आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस