शाळा-महाविद्यालये बंद उत्स्फूर्त

By Admin | Updated: February 2, 2016 02:15 IST2016-02-02T02:15:17+5:302016-02-02T02:15:17+5:30

हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी ...

Improved off school-colleges | शाळा-महाविद्यालये बंद उत्स्फूर्त

शाळा-महाविद्यालये बंद उत्स्फूर्त

रोहित आत्महत्याप्रकरण : आंबेडकरवादी संघर्ष समितीचा पुढाकार
यवतमाळ : हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीने पुकारलेल्या शाळा-महाविद्यालय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील शैक्षणिक संस्थांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला.
रोहित वेमुला हा विद्यार्थी भविष्यातील भारताचा उज्ज्वल संशोधक होता. भविष्यात या देशात कोणत्याही रोहितसोबत हा दुर्दैवी प्रसंग घडू नये, यासाठी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सजग व जागरूक राहून बंदमध्ये सहभाग नोंदविला. शहरातील सर्व शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक बंदमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, आंबेडकराईट गार्ड, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, आदिवासी विकास परिषद, लॉर्ड बुद्धा मैत्री संघ, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, दि बुद्धिस्ट सोसिअल पेन्शनर्स असोसिएशन, आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस अ‍ॅन्ड पीस, सन्मान पक्ष, डॉ.आंबेडकर सोशल फोरम, डॉ.आंबेडकर खेळ व सांस्कृतिक प्रबोधिनी आदी संस्था, संघटना सहभागी झाल्या होत्या.
कार्यकर्त्यांनी शाळा-महाविद्यालयांना भेटी देवून तेथील प्रशासनाला या बंदमागील भूमिका समजावून सांगितली. शाळा तत्काळ बंद करून सहकार्य केले. बंदच्या यशस्वीतेसाठी सुनील पुनवटकर, धम्मा कांबळे, हरिदास अघम, के.एस. नाईक, संजय गुजर, धर्मपाल माने, एन.जे. थूल, बिना भगत, सुधीर सोनोने, किरण कुमरे, महेंद्र भगत, पी.डी. पाटील, एस.आर. मेढे, एस.पी. लिहीतकर, हिरालाल गायकवाड, एस.एस. तामगाडगे आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसचे आंदोलन
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहीत वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यानंतर रोहीतला जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, अशोक बोबडे, राहुल ठाकरे, देवानंद पवार, अरुण राऊत, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड, रवी ढोक, किरण कुमरे, चंदू चौधरी, उषा दिवटे, शब्बीरभाई, सिकंदर शहा, प्रदीप डंभारे, घनश्याम अत्रे, अरुण ठाकूर, बालू काळे, बबलू देशमुख, युवक काँग्रेसचे नितीन मिर्झापुरे, विक्की राऊत, अनिल गाडगे, कृष्णा पुसनाके, सुमंत गोगरकर, शुभम लांडगे, आमीर बोथा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुतळा दहनाचा काँग्रेसकडून निषेध
युवक काँग्रेसने पुकारलेल्या महाविद्यालय बंदला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. वेमुला आत्महत्या प्रकरणात धर्मांध व सांप्रदायिक शक्तीच दोषी आहे. त्यामुळे या शक्तींनी चिडून अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा पुतळा जाळला. या घटनेचा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी जाहीर निषेध केला.

Web Title: Improved off school-colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.