धनादेश अनादर प्रकरणी कारावास

By Admin | Updated: July 12, 2015 02:39 IST2015-07-12T02:39:50+5:302015-07-12T02:39:50+5:30

उसनवार घेतलेल्या रकमेपोटी दिलेला धनादेश अनादर झाल्याने येथील श्याम वसंतराव रेगुंडावार याला एक महिन्याच्या ...

Imprisonment in favor of defamation case | धनादेश अनादर प्रकरणी कारावास

धनादेश अनादर प्रकरणी कारावास

यवतमाळ : उसनवार घेतलेल्या रकमेपोटी दिलेला धनादेश अनादर झाल्याने येथील श्याम वसंतराव रेगुंडावार याला एक महिन्याच्या कारवासाची शिक्षा आणि ७०
हजार रुपये दंडाची शिक्षा
न्यायाधीश एम.एस. तिवारी यांनी सुनावली.
श्याम रेगुंडावार याने सन २००८ मध्ये श्याम आरगुलवार यांच्याकडून ८० हजार रुपये उसनवार घेतले होते. या रकमेच्या परतफेडी पोटी त्यांना दिलेला धनादेश अनादरीत झाला. न्यायालयामार्फत नोटीस देऊनही रक्कम मिळत नसल्याने शाम आरगुलवार यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायमूर्ती एम.एस. तिवारी यांच्या न्यायालयात हा खटला चालला.
या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकूण घेत न्यायालयाने श्याम आरगुलवार यांच्यावतीने निर्णय दिला. रेगुंडावार याने आरगुलवार यांना उसनवार घेतलेली रक्कम ८० हजार रुपये, नुकसान भरपाई ७० हजार असे एकूण एक लाख ५० हजार रुपये एक महिन्यात द्यावे असा आदेश दिला. तसेच फसवणूक प्रकरणी रेगुंडावार यांना एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात आरगुलवार यांची बाजू अ‍ॅड़ रवींद्र भुमरे यांनी मांडली. (वार्ताहर)

Web Title: Imprisonment in favor of defamation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.